आपण गुगलवर विश्वास ठेवू शकतो का? | गोष्ट दुनियेची BBC News Marathi
Sep 21, 2024 · 15 min
अमेरिकेतल्या एका कोर्टानं दिलेल्या निर्णयानं गुगलविषयी प्रश्न निर्माण केले. सर्च मार्केटमध्ये सर्वात बळकट कंपनी म्हणून गुगल आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेत असून त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना वाव मिळणंच कठीण झालं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. अनेकांच्या मते ही कंपनी एवढी मोठी झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊया की आपण गुगलवर विश्वास ठेवू शकतो का?