सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीच्या गाभ्याचा आकार बदलतोय! का घडतंय असं?
Feb 11, 2025 · 6 min
गेल्या 20 वर्षांमध्ये पृथ्वीच्या गाभ्याचा आकार बदललेला असण्याची शक्यता असल्याचं संशोधकांच्या एका गटाने म्हटलंय. पृथ्वीचा गाभा हा एखाद्या चेंडूच्या आकाराचा असल्याचं मानलं जातं. पण आता मात्र या अंतर्गाभ्याच्या कडांपाशी काही ठिकाणी 100 मीटर वा त्यापेक्षा अधिक उंची बदलली असल्याचं प्रा. जॉन विडेल यांनी म्हटलंय. त्यांच्याच नेतृत्त्वाखालच्या संशोधकांच्या गटाने यावर अभ्यास केला. असं कशामुळे झालं? त्याचा परिणाम काय आहे? पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी हा धोका आहे का... समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे