एक गंजणारं जहाज दक्षिण चीन समुद्राविषयी काय सांगतं? BBC News Marathi
२०२४ अगस्ट ३ · १६ मिनेट
17 जूनला वादग्रस्त साऊथ चायना सी म्हणजे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या चीन आणि फिलिपिन्सच्या बोटींमध्ये चकमक उडाली. चीनच्या तटरक्षक दलानं सिएरा माद्रे नावाच्या जहाजाला रसद पोहोचवणाऱ्या फिलिपिन्सच्या बोटींना त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. सिएरा माद्रे हे जहाज फिलिपिन्सनं 1999 साली मुद्दाम या जागी उभं केलं होतं आणि सध्या हे जहाज गंजलेल्या अवस्थेत आहे. हे गंजलेलं जहाज साऊथ यचायना सी मधल्या तणावाविषयी काय सांगतं? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज प्रेझेंटर : जान्हवी मुळे ऑडियो: तिलक राज भाटिया