
पोड्काष्ट
BBC Marathi Audio
१८२ एपिसोड · mr
जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
२०२६ मे ८ · १४ मिनेट
शॉपलिफ्टिंग म्हणजे एखाद्या दुकानातून माल चोरणे. जगभरात शॉपलिफ्टिंगच्या घटना का वाढल्या?
२०२६ अप्रिल ११ · १५ मिनेट
. रीवाईल्डिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी वन्यजीवन पुन्हा बहाल करून निसर्गाचं संतुलन साधायचं.
२०२६ मार्च १५ · १७ मिनेट
महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी, अगदी शहरांतही पाण्याची टंचाई जाणवते आहे.
२०२६ फेब्रुअरी २१ · १६ मिनेट
अमेरिका आणि रशियातील महत्त्वाच्या अणूकराराची मुदत संपल्यानं निशस्त्रीकरण ठप्प होईल का?
२०२६ फेब्रुअरी ७ · १२ मिनेट
म्युझिक टूर्स फायद्याचा सौदा कशा बनल्या?
२०२६ जनवरी १७ · १४ मिनेट
नायजेरियात अलीकडच्या काळात हजारो लोकांचं अपहरण झालं, जी इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे.
२०२६ जनवरी ११ · १८ मिनेट
भाषेचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मग सगळ्या जगाची एकच जागतिक भाषा असावी का?
२०२५ डिसेम्बर २७ · १३ मिनेट
वाईनच्या घसरत्या किंमती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे या उद्योगावर संकटाचे ढग दाटले आहेत.
२०२५ डिसेम्बर २० · १५ मिनेट
ऑस्ट्रेलियानं सोशल मीडियावर लावलेले निर्बंध जगभरात लागू होऊ शकतात का?
२०२५ डिसेम्बर १३ · १५ मिनेट
सायप्रस अनेक दशकांपासून दोन भागांत विभागला आहे.पण या देशाचं पुन्हा एकीकरण होऊ शकतं का?
२०२५ डिसेम्बर ६ · १४ मिनेट
बेनिन काही खास लोकांना नागरिकत्व का देत आहे?
२०२५ नोभेम्बर २९ · १४ मिनेट
भारतासह जगभरात हजारो लोक दरवर्षी हवामान बदलामुळे विस्थापित होत आहेत.
२०२५ नोभेम्बर २३ · १३ मिनेट
जगभरात चहा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहे.
२०२५ नोभेम्बर ८ · १७ मिनेट
अनेक दशकं केवळ पाच देशच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य आहेत. मग ही संस्था किती गरजेची आहे?
२०२५ नोभेम्बर १ · १७ मिनेट
डोनाल्ड ट्रम्प क्रिप्टो करन्सीवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करत आहेत का?
२०२५ अक्टोबर १८ · १४ मिनेट
लाईम डिसिज या टिक म्हणजे गोचिड चावल्यामुळे होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे.
२०२५ अक्टोबर १२ · १५ मिनेट
जगातल्या इतर अनेक देशांमध्ये पाण्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडला गेला आहे.
२०२५ सेप्टेम्बर ३० · १५ मिनेट
AI वापरून चेहऱ्याची आणि आवाजाची नक्कल करून बनवलेल्या व्हिडियोंपासून कायदा कसं रक्षण करेल?
२०२५ सेप्टेम्बर २२ · २३ मिनेट
जपानमध्ये सानसिटो नावाचा अतीउजव्या विचारसरणीचा पक्ष आता एलडीपीला आव्हान देतो आहे.
२०२५ सेप्टेम्बर १५ · १६ मिनेट
पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 11,700 सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह सक्रीय आहेत.
२०२५ सेप्टेम्बर २ · १५ मिनेट
भारतात शाळकरी मुलांना मध्यान्ह भोजन दिलं जातं, इंडोनेशियानंही तशी योजना सुरू केली आहे.
२०२५ अगस्ट २५ · १५ मिनेट
भारत-पाकिस्तान, इस्रायल-गाझा,रशिया-युक्रेन अशा संघर्षात ड्रोनचा वापर वाढला आहे.
२०२५ अगस्ट १९ · १६ मिनेट
पश्चिम आशियातला देश सीरिया अलीकडे पुन्हा चर्चेत आहे, कारण तिथे पुन्हा चकमकी उडाल्या.
२०२५ अगस्ट १२ · १५ मिनेट
थायलंड आणि कंबोडियामधला सीमावाद पुन्हा उफाळून आला, तसं थायलंडचं राजकारणही ढवळून निघालं.
२०२५ अगस्ट ४ · १५ मिनेट
चिलीमधल्या वेरा रुबिन वेधशाळेतली नवी दुर्बिण विश्वाची नवी रहस्य उलगडेल अशी अपेक्षा आहे.
२०२५ जुलाई २८ · १४ मिनेट
AI मुळे सखोल विचार करण्याची क्षमता कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
२०२५ जुलाई २१ · १६ मिनेट
चीन-तैवान संघर्ष पेटला तर अमेरिका काय भूमिका घेते यावर जगाचं लक्ष राहील.
२०२५ जुलाई ७ · १५ मिनेट
जगभरात तेलाच्या पुरवठ्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी नेमकी किती महत्त्वाची आहे?
२०२५ जुन ३० · १५ मिनेट
जीन एडिटिंगद्वारा आजारांवर मात करता येईल का?
२०२५ जुन २३ · १७ मिनेट
हिऱ्याच्या खाणी बोट्स्वानाच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. पण आता हा उद्योग संकटात सापडतोय.
२०२५ जुन १९ · १६ मिनेट
भारतासह जगभरात फंगल आजार चिंतेची बाब नक्कीच बनले आहेत
२०२५ जुन ९ · १५ मिनेट
तांदळाच्या टंचाईची समस्या बराच काळापासून जाणवते आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत.
२०२५ जुन ३ · १६ मिनेट
अमेरिकेत गोवरच्या वाढत्या केसेस पाहता जगानं सावध व्हावं, असं WHO अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
२०२५ मे २८ · १६ मिनेट
कोलोसल बायोसायन्सेस कंपनीनं एप्रिल 2025 मध्ये डायरवूल्फची पिल्लं तयार केली होती.
२०२५ मे १८ · १५ मिनेट
ट्रम्प यांची आर्थिक धोरणं नेमकी काय आहेत?
२०२५ मे ५ · १७ मिनेट
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावासोबतच काश्मीरचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला.
२०२५ अप्रिल २७ · १६ मिनेट
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून पुतिन यांच्याविषयी अमेरिकेच्या धोरणात बदल होताना दिसला.
२०२५ अप्रिल २० · १६ मिनेट
अमेरिकेसारखेच इतर देश आर्थिक मदतीत कपात करण्याची शक्यता कायम आहे.
२०२५ अप्रिल १२ · १५ मिनेट
स्पेस एक्स मंगळमोहीमेच्या तयारीत आहे, पण अलीकडे त्यांच्या यांनांना अपघात झाले आहेत.
२०२५ अप्रिल ६ · १६ मिनेट
तुमची जमिन सरकारनं थेट ताब्यात घेतली तर? दक्षिण आफ्रिकेत आता सरकारला असं करता येणार आहे.
२०२५ मार्च २२ · १७ मिनेट
इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय अलीकडे चर्चेत आलं आहे.
२०२५ मार्च ३ · १५ मिनेट
पुरुषांसाठी गर्भनिरोधक पर्याय वाढवण्यावर अनेक दशकं प्रयोग सुरू आहेत.
२०२५ फेब्रुअरी २४ · १६ मिनेट
अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा पनामा कालवा अलीकडे सतत चर्चेत आहे.
२०२५ फेब्रुअरी १७ · १५ मिनेट
गेल्या काही वर्षांत अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणींचा आणि महागाईचा सामना करतायत.
२०२५ फेब्रुअरी १० · १५ मिनेट
या धरणाची जागा आणि विशाल आकार यावरभारतासारख्या शेजारी देशांनी चिंता व्यक्त केली आहे.
२०२५ फेब्रुअरी ३ · १५ मिनेट
अनेक प्रकारच्या कॅन्सरवरील लशींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२०२५ जनवरी २८ · १५ मिनेट
विषारी आणि बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात.
२०२५ जनवरी १२ · १६ मिनेट
भारताचा हिमालयातला शेजारी देश भूतान GDP ऐवजी 'ग्रॉस नॅशनल हॅपीनेस'वर भर देतो.
२०२५ जनवरी २ · १५ मिनेट
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बाल्टिक समुद्रातल्या साधनसंपत्तीवर अनेक हल्ले झाले आहेत.
२०२४ डिसेम्बर २३ · १५ मिनेट
जर्मनीत ओलाफ शोल्झ यांचं आघाडी सरकार कोसळल्यानं राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे.
२०२४ डिसेम्बर १६ · १४ मिनेट
सीरियात बंडखोरांनी बशर अल असद यांची सत्ता उलथवल्यावर पुढे काय होईल?
२०२४ डिसेम्बर १० · १६ मिनेट
बोईंग कंपनीला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
२०२४ डिसेम्बर २ · १५ मिनेट
यूट्यूबवर व्हिडियो पाहणं तुमच्या सवयीचं असेल, पण हे यूट्यूब आता टीव्हीलाही मागे टाकतंय.
२०२४ नोभेम्बर २५ · १७ मिनेट
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काही वर्षांनी ते निकामी होईल, तेव्हा पुढे काय होईल?
२०२४ नोभेम्बर १८ · १४ मिनेट
कॅनडाच्या जॅस्पर शहरात जुलै-ऑगस्टमध्ये मोठा वणवा पेटला. अशा आगींवर नियंत्रण कसा मिळवायचं?
२०२४ नोभेम्बर ११ · १६ मिनेट
अनेक देशांतील माध्यमांमध्ये रुपर्ट मरडॉक यांची गुंतवणूक आहे. त्यांचे वारसदार कोण होणार?
२०२४ अक्टोबर २९ · १५ मिनेट
इस्रायल-हमास संघर्ष आता हिजबुल्लाह-इराणपर्यंत पोहोचला आहे.मग मध्यपूर्वेत शांतता कशी येईल?
२०२४ अक्टोबर २० · १६ मिनेट
अफगाणिस्तानात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मग तिथलं तालिबान सरकार कसं काम करतंय?
२०२४ अक्टोबर १४ · १५ मिनेट
इस्रायल-हमास युद्धाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण इथला संघर्ष वर्षानुवर्ष जुना आहे.
२०२४ अक्टोबर ७ · १५ मिनेट
पॅसिफिक महासागरात रापानुई बेट हे जगातल्या मानवी वस्ती असलेल्या सर्वात दुर्गम जांगांपैकी एक आहे. या बेटावर शेकडो प्राचीन मूर्ती आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे इथे बरेच बदल होताना दिसत आहेत. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की ईस्टर आयलँडवरचे हे पुतळे हवामान बदलाचा मार झेलू शकतील का? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ सेप्टेम्बर २१ · १५ मिनेट
अमेरिकेतल्या एका कोर्टानं दिलेल्या निर्णयानं गुगलविषयी प्रश्न निर्माण केले. सर्च मार्केटमध्ये सर्वात बळकट कंपनी म्हणून गुगल आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेत असून त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना वाव मिळणंच कठीण झालं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. अनेकांच्या मते ही कंपनी एवढी मोठी झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊया की आपण गुगलवर विश्वास ठेवू शकतो का?
२०२४ सेप्टेम्बर १४ · १५ मिनेट
लेबननमधली संघटना हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष गाझामध्ये गेल्या वर्षी युद्ध सुरू झाल्यापासून आणखी गहिरा झाला आहे. अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना असा दर्जा दिला आहे. पण ही संघटना नेमकी काय आहे? त्यांना काय हवं आहे? हिजबुल्लाह गाझामधल्या पॅलेस्टिनी लोकांना आणि हमास या संघटनेला पाठिंबा देत आहे की इस्रायलचं लक्ष या युद्धात गुंतलंय याचा फायदा घेत आहे? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊया, हिजबुल्लाहला नेमकं काय हवं आहे?
२०२४ सेप्टेम्बर ८ · १७ मिनेट
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी आधी 'प्रोजेक्ट 2025'ची चर्चा आहे. काही लोकांच्या मते ही यशाची किल्ली आहे तर अनेकांच्या मते हे धोकादायक असून यामुळे समाजात दुफळी माजेल. हे प्रोजेक्ट 2025 काय आहे आणि ते अमेरिकेचं भवितव्य कुठल्या दिशेला नेत आहे? गोष्ट दुनियेचीमध्ये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ अगस्ट ३१ · १९ मिनेट
सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सरू होता, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणइथल्या राजकोट किल्ल्यावर उभा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या 28 फूट उंच पुतळ्याचं अवघ्या 9 महिन्यांपूर्वी, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालं होतं. त्यामुळे त्यावरून राग आणि संताप राज्यभरात व्यक्त करण्यात आला. पुतळा बांधतांना निकष पाळले गेले नाही, भ्रष्टाचार झाला, असे आरोप विरोधी पक्षांनी केले, तर सत्ताधाऱ्यांना यासाठी माफी मागावी लागली. मात्र पुतळा पडल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले. काही आठवड्यांआधीच शेजारी बांगलादेशात मात्र आणखी एक पुतळा पडला, बहुदा पाडण्यात आला होता. तो होता शेख मुजीबूर रहमान यांचा, जे बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जातात. बांगलादेशातल्या कोटाविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं, आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याची अशीच नासधूस करण्यात आली. पण पुतळेच का? कुठल्याही संस्कृतीत हे निर्जीव, मुके पुतळे इतके महत्त्वाचे का असतात? एखाद्या ठिकाणी पुतळा का उभारला जातो? किंवा कुठल्याही आंदोलनादरम्यान, क्रांतीदरम्यान पुतळे का पाडले जातात? आज गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ अगस्ट २७ · १६ मिनेट
सिंथेटिक ओपियॉइड्स अर्थात वेदनाशामक औषधांचा गैरवापर आणि ओव्हरडोस ही मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाय म्हणून कॅनडामध्ये टोरंटोनं दोन वर्षांपूर्वी एक मागणी केली होती, की या शहरात खासगी वापरासाठी ड्रग्ज बाळगणं डिक्रिमिनलाईझ केलं जावं म्हणजे हा अपराध मानला जाऊ नये. कॅनडातल्याच ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रायोगिक तत्वावर अशीच योजना सुरू आहे. पण ड्रग्जचा वापर कायदेशीर करणे हे व्यसनावरचे उत्तर ठरू शकते का? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ अगस्ट १८ · १५ मिनेट
मार्च 2024 मध्ये अमेरिकेतल्या एका डेअरी फार्मवर गाई आणि कर्मचाऱ्यांमध्येही बर्ड फ्लूची साथ पसरली. पहिल्यांदाच गाईंना या विषाणूचा संसर्ग झाला असून गाईंपासून माणसांमध्येही हा आजार पसरला आहे. एखाद्या सस्तन प्राण्याकडून माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याचीही ही पहिली घटना ठरली. अमेरिकेतले ते कर्मचारी तर बरे झाले आहेत. पण तेव्हापासून बर्ड फ्लूची साथ अमेरिकेच्या अनेक डेअरी फार्म्समध्ये पसरली आहे. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, की माणसांसाठी बर्ड फ्लू ही किती मोठी चिंतेची बाब आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ अगस्ट ३ · १६ मिनेट
17 जूनला वादग्रस्त साऊथ चायना सी म्हणजे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या चीन आणि फिलिपिन्सच्या बोटींमध्ये चकमक उडाली. चीनच्या तटरक्षक दलानं सिएरा माद्रे नावाच्या जहाजाला रसद पोहोचवणाऱ्या फिलिपिन्सच्या बोटींना त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. सिएरा माद्रे हे जहाज फिलिपिन्सनं 1999 साली मुद्दाम या जागी उभं केलं होतं आणि सध्या हे जहाज गंजलेल्या अवस्थेत आहे. हे गंजलेलं जहाज साऊथ यचायना सी मधल्या तणावाविषयी काय सांगतं? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज प्रेझेंटर : जान्हवी मुळे ऑडियो: तिलक राज भाटिया
२०२४ जुलाई २४ · १७ मिनेट
एआयच्या मदतीनं सर्व प्रकारच्या कॅन्सरवर गुणकारी ठरतील अशी औषधं तयार करता येऊ शकतात. पृथ्वीचं वाढतं तापमान रोखण्यासाठी मदत होऊ शकते. इतकंच नाही तर अनेक कामं, जी माणसांना करायची इच्छा नाही, ती एआयच्या मदतीनं मशीन्स करू शकतील. पण अशा एआयला विकसित करण्यासाठी करोडो कंप्युटर्स सुरू ठेवायचे आणि त्यांना एअरकंडिशनिंगद्वारा थंड ठेवायचं तर किती मोठ्ठ्या प्रमाणात वीजेची गरज पडते. म्हणूनच गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण प्रश्न विचारतोय की आपल्याकडे एआय चालवण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध आहे का?
२०२४ जुलाई ६ · १५ मिनेट
दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडींना कुणीतरी एक महागडी डिझाईनर हँडबॅग भेट म्हणून द्यायचा प्रयत्न केला, आणि त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले. नेमकं काय घडलं? यावरून दक्षिण कोरियाच्या राजकारणाविषयी आपल्याला काय कळतं? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ जुलाई २ · १६ मिनेट
एक महाकाय हिमनग महासागरात वाहात चालला आहे. हा हिमनग A23A या नावाने ओळखला जातो. हा कुठला सामान्य हिमनग नाहीये, तर हा जगातला सर्वात मोठा हिमनग आहे. 1 खर्व टन किलोचा हा बर्फाचा महाकाय तुकडा समुद्रातून वाहत पुढे सरकतोय. या आठवड्यात ‘गोष्ट दुनियेची ’मध्ये आपण याच महाकाय हिमनगाविषयी बोलणार आहोत. या हिमनगापासून आपण काय शिकू शकतो? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ जुन १५ · १६ मिनेट
मेंदूचा आजार म्हणजे न्यूरॉलॉजिकल आजार असलेल्या मल्टिपल स्केलॉरिसिस म्हणजे MS मागे EBV या विषाणूचा हात असावा, असं संशोधकांना काही काळापासून वाटत होतं. दोन वर्षांपूर्वीच ते सिद्ध झालं. या विषाणूचा शोध लागला त्यालाही नुकतीच पन्नास वर्ष झाली आहेत. सध्या जगभरात तीस लाख लोक मल्टिपल स्क्लेरॉसिसनं पीडीत आहेत. हा आजार रोखणं आता खरंच शक्य होणार आहे का? गोष्ट दुनियेचीमध्ये आजच्या भागात तेच जाणून घेणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ जुन ८ · १६ मिनेट
भारताचा शेजारी देश असलेला म्यानमार पुन्हा धुमसतो आहे. म्यानमारमध्ये लष्करशाही आहे आणि सैन्याच्या नेतृत्त्वातलं त्यांचं सरकार सध्या गृहयुद्धात गुंतलं आहे. खरंतर भारताच्या उंबरठ्यावर आग्नेय आशियातल्या या देशात अंतर्गत कलह ही नवी गोष्ट नाही. पण आताचा हा नवा संघर्ष देशाला मोठ्या संकटात टाकतो आहे. म्हणूनच या आठवड्यात गोष्ट दुनियेचीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्यानमार विखुरण्याच्या मार्गावर आहे का? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ मे २२ · १७ मिनेट
'मला वजन कमी करायचं आहे, पण डाएट आणि जिमचा तर कंटाळाच येतो' अशी चर्चा तुमच्या कानावर अनेकदा पडली असेल किंवा तुम्ही स्वतः वाढलेल्या वजनाविषयी कधी ना कधी विचार केला असेल. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ही काही देशांमध्ये तर राष्ट्रीय समस्या बनली आहे आणि वजन कमी करण्यासाठी सरकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी काहीवेळा वजन घटवणाऱ्या औषधांचा वापरही केला जातो. हॉलिवूडमधले कोणते सेलिब्रिटी वजन घटवण्यासाठी असं औषध घेतात, याविषयी सोशल मीडियावर गरमागरम चर्चा रंगताना दिसते. पण ही औषधं सर्रास सर्वांसाठी नाहीत. अशा औषधांनी लठ्ठपणाची समस्या खरंच दूर होते का, याच प्रश्नाचं उत्तर आपण गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ मे १४ · १७ मिनेट
मार्च 2024 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांंनी व्हिएन्नामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविषयक आयोगासमोर बोलताना सांगितलं की अमेरिकेत 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे सिंथेटिक ड्रग्स किंवा ओपियॉइड्स. एका अहवालानुसार 2022 साली सिंथेटिक ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे एक लाख आठ हजार जणांचा मृत्यू झाला. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? प्रेझेंटर : जान्हवी मुळे ऑडियो: तिलक राज भाटिया
२०२४ मे ४ · १७ मिनेट
चॉकलेट कुणाला आवडत नाही? पण सध्या कोको आणि चॉकलेटच्या उत्पादनांच्या किंमती वाढल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. फेब्रुवारी 2024 मध्ये तर चॉकलेटच्या किंमतीनं नवा विक्रम रचला. अमेेेरिकेतत कोकोची किंमत दुप्पटीनं वाढली आणि कोको आता तिथे प्रतिटन 5874 डॉलर्सला पोहोचलं आहे. कोको उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देेशांना सध्या हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहेे. त्यामुळेच या किंमती वाढल्या आहेत का? प्रेझेेंटर : जान्हवी मुळेे ऑडियो एडिटिंग : तिलक राज भाटिया
२०२४ अप्रिल १२ · १७ मिनेट
जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल. मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा सामना शहरं कसा करतील? त्यावर उपाय म्हणून जमिनीखाली शहरांचा विस्तार करण्याची योजना काहीजण आखत आहेत. खरंच असं शक्य आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ अप्रिल ५ · १७ मिनेट
इजिप्तच्या गिझामधले पिरॅमिड या देशातल्या प्राचीन संस्कृतीची भव्य प्रतीकं आहेत. पण गेल्या काही शतकांत या पिरॅमिड्सची बरीच हानी झाली. त्यात ठेवलेला खजिना लुटला गेला. पिरॅमिडच्या बाह्य पृष्ठभागाचंही नुकसान झालं. आता इजिप्तच्या सरकारनं पिरॅमिडचा जीर्णोद्धार करण्याची योजना आणली आहे ज्यावरून वाद सुरू झाला आहे. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, की इजिप्तच्या पिरॅमिडचं काय होणार? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ मार्च २६ · १८ मिनेट
अनेक युरोपिय देशांमधली लोकसंख्या म्हातारी होते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी युरोपियन देशांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यातून काही मोठा बदल होताना दिसत नाही. मग युरोप आपला घटता प्रजनन दर वाढवू शकतो का? प्रेझेंटर : जान्हवी मुळेे ऑडियो: तिलक राज भाटिया मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
२०२४ मार्च १९ · १७ मिनेट
एखादी जागा कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी आपण काय करतो? तर अनेकदा त्या जागेचा नकाशा पाहतो. आपलं जग समजून घेण्यासाठी नकाशांचा वापर मानवी संस्कृतीत अगदी सुरुवातीपासून केला गेल्याचं दिसतं. इतकंच नाही, तर गेल्या काही दशकांत मानवी शरीराची मूलभूत रचना समजून घेण्यासाठी नकाशे बनवले जात आहेत. मानवी जनुक कसं कार्य करतात हे समजून घेण्यासाठी, सहा देशांच्या शास्त्रज्ञांनी 1990 मध्ये मानवी जीनोम प्रकल्प सुरू केला होता. गोष्ट दुनियेची मध्ये या भागात आपण जाणून घेणार आहोत की हा ह्युमन सेल अॅटलास काय आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ फेब्रुअरी २९ · १८ मिनेट
जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत भारताच्या चंद्रयान-3 पाठोपाठ जपानचा ‘स्लिम’ लँडर आणि अमेरिकेतल्या इंट्यूटिव्ह मशीन्स या खासगी कंपनीचं ओडिसियस हे यान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं. सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये चंद्रावर जाण्याची आणि माणसाला पुन्हा चंद्रावर नेण्याची चुरस रंगलेली दिसते आहे. हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२४ फेब्रुअरी २३ · १८ मिनेट
जगभरातल्या काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी, ज्यामुळे तुमचं विश्व होईल अधिक समृद्ध
२०२४ फेब्रुअरी ९ · १६ मिनेट
1492 सालची गोष्ट. अटलांटिक महासागरात प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर अचानक एक मोठं संकट उभं राहिलं, ज्याची त्या दर्यावर्दींनी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या जहाजासमोर मैलोनमैल दूर दाट शेवाळ पसरलं होतं. आपलं जहाज त्यात अडकून बुडणार तर नाही ना, अशी चिंता त्या खलाशांना सतावत होती. आता पाचशे वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच सरगॅसम नावानं ओळखलं जाणारं लाखो टन सागरी शैवाल जगासमोर मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं आहे. मोठ्या प्रमाणात हे सागरी शैवाल कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर पोहोचतंय. त्यामुळे तिथल्या रहिवाशांच्या आरोग्याला आणि अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. हे सरगॅसमचं आव्हान काय आहे, याच प्रश्नाचं उत्तर आपण गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत. मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
२०२४ जनवरी ३० · १७ मिनेट
ऑक्टोबर 2023 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टोयोटानं दावा केला की ते लवकरच इलेक्ट्रिक कार्ससाठी एक अशी बॅटरी बनवणार आहेत जिच्यावर गाडी 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापू शकेल. इतकंच नाही, तर ही बॅटरी फक्त दहा मिनिटांत रिचार्ज होऊ शकेल. टोयोटा कंपनीचे प्रमुख कोजी साटो यांनी टोकियोमध्ये ही घोषणा केली, ते म्हणाले की हा इलेक्ट्रिक कार्ससाठीच नाही तटोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? गोष्ट दुनियेचीमध्ये या भागात आपण याचंच उत्तर शोधणार आहोत.र वाहन उद्योगासाठी एक मोठा क्रांतिकारी शोध आहे.
२०२४ जनवरी ९ · १७ मिनेट
2024 मध्ये जगातला सर्वात मोठा क्रीडा सोहळा अर्थात ऑलिंपिकचं आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये केलं जाणार आहे. त्यासाठी शहरात तयारी सुरू आहे. पण पॅरिसच्या सीन नदीचं प्रदूषण, मेट्रो लाईन्सचं अर्धवट काम आणि राजकीय आंदोलनं अशा गोष्टींचं आव्हान आयोजकांसमोर आहे.
२०२४ जनवरी १ · १५ मिनेट
कोव्हिडच्या जागतिक साथीनंतर करोडो कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही सामान्य गोष्ट बनली होती. साथीच्या तीन वर्षांनंतर अनेक कर्मचारी आता ऑफिसात परतले आहेत, पण काही क्षेत्रांमध्ये अजूनही कर्मचारी घरून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर कंपन्या आता आपल्या कर्माचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्याचा आग्रह करताना दिसत आङेत. अर्थात प्रत्येक देशात परिस्थिती वेगळी आहे. मग आता यापुढच्या काळात कामाचं स्वरूप कसं असेल? ‘वर्क फ्रॉम होम’मुळे खरंच काम होतं का
२०२३ डिसेम्बर २३ · १५ मिनेट
सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंग्डम म्हणजे युकेनं एक घोषणा केली, जी फक्त युकेच नाही तर कदाचित जगभरातच लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकते. युकेमधली नवीन औषधांना मंजुरी देणारी संस्था नॅशनल हेल्थ अँड केअर एक्सलंस अर्थात NICE ने तेव्हा एका नवीन मायग्रेनरोधक औषधाला मंजुरी दिली. मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जगभरात जवळपास एक अब्ज लोकांना त्याचा त्रास होतो. या आजारात डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं आणि याचा परिणाम मग नातेसंबंधांवरही होतो. ज्यांना हा आजार आहे, अशा लोकांनाही हे नवं औषध दिलं जाऊ शकतं, असा दावा नाईसनं केला आहे. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हाच प्रश्न विचारतोय, की मायग्रेनवरच्या उपचारांमध्ये आता काही बदल होणार आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ डिसेम्बर १६ · १७ मिनेट
बांगलादेशाची अर्थव्यवस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशांमधल्या अनेक मोठ्या फॅशन कंपन्यांसाठी बांगलादेश हा मोठा कपडा पुरवठादार आहे. पण सध्या निषेध मोर्चे आणि वाढती महागाई यांमुळे बांगलादेशच्या आर्थिक यशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वर्चस्वाला सामान्य जनता आव्हान देताना दिसते आहे. विरोधी पक्ष म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपी हसीना यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकते आहे. निवडणुकीआधी तटस्थ अंतरीम सरकार स्थापन झालं नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची त्यांची तयारी आहे. शेख हसीना यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप लावला जातो आहे, पण हसीना यांनी तो आरोप नाकारला आहे. त्या हजारो आंदोलकांवर कडक कारवाई करतायत. सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याचं दिसतंय. बांगलादेशात अशी उलथापालथ का माजते आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे आजची गोष्ट दुनियेची. मूळ पॉडकास्ट - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ डिसेम्बर ४ · १७ मिनेट
इंग्रजी शिक्षिका फरीदा आणि खालिद हा एक वैद्यकीय पुरवठादार गाझामधल्या युद्धात जिवंत राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अत्यंत खासगी व्हॉईस संदेशांमधून जगाला सांगतायत. गाझामध्ये बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटात अपार नुकसान होऊनही ते जिद्दीने तग धरून आहेत. गाझा डायरीची निर्मिती हया अल बदरनेह, लारा एल्गेबाली, ममदौह अकबिक मोहम्मद शलाबी आणि मेरी ओ'रेली यांनी केली होती. संपादन - रेबेका हेन्शके आणि सायमन कॉक्स मिक्सिंग - ग्रॅहम पुड्डीफूट बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी बीबीसी अरेबिक तपास उत्पादन. मराठी निर्मिती - जान्हवी मुळे ऑडिओ एडिटर - तिलक राज भाटिया
२०२३ नोभेम्बर १८ · १५ मिनेट
आपण आयुष्यभर खातच असतो. खासकरून सणावारांना. आणि मग पोटाचं काही बिघडलं की आपण तब्येतील किंवा अन्नालाच दोष देतो. आपल्या पोटाचं शास्त्र आपल्याला कधी समजलंय का? ऐका ही गोष्ट दुनियेची मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ अक्टोबर २८ · १७ मिनेट
ऑगस्ट 2023 मध्ये भारत आणि चीनमधला तणाव पुन्हा वाढला. एकमेकांवरच्या विश्वासाला तडे गेले आणि सीमेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दोन्ही देशांनी एकमेकांना संयमानं वागण्याचा सल्ला दिला. झालं काहीच नाही, पण दोन्ही देशांमधली मतभेदांची दरी आणखी वाढली. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या दोन देशांत अनेक दशकांपासून सीमावाद सुरू आहे. पण तणावामागे केवळ हे एकच कारण नाही. मग हे दोन्ही देश आपल्यातलं नातं सुधारू शकतात का, सारं काही आलबेल बनू शकतं का? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ अक्टोबर २१ · १८ मिनेट
7 ऑक्टोबर 2023. पॅलेस्टाईन कट्टरवादी गट हमासनं इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला. इस्रायलनंही प्रत्युत्तरादाखल हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. पण फक्त गाझा आणि इस्रायलच धुमसत नाहीये. तर इस्रायलच्या ताब्यातल्या वेस्ट बँक प्रदेशामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांसाठीही 2023 हे वर्ष सर्वात हिंसक ठरलं आहे. पण सध्या केवळ वेस्ट बँकच पॅलेस्टिनी प्रशासनाच्या ताब्यात आहे तर गाझा पट्टीवर हमास या कट्टरतावादी संघटनेनं ताबा मिळवला आहे. गेल्या तीन दशकांत या हमास आणि इस्रायलमध्येच प्रामुख्यानं हिंसक संघर्ष होत आला आहे. पण आत्ताच्या हल्ल्यानंतर पुढे काय होऊ शकतं? ऐका ही गोष्ट दुनियेची. संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ सेप्टेम्बर ३० · १६ मिनेट
21 सप्टेंबर 2023. ब्राझिलच्या अमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींमध्ये अशी आनंदाची, उत्साहाची लहर पसरली. यामागचं कारण होतं तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक ऐतिहासिक निर्णय. पिढ्यानपिढ्या या जंगलांवर आदिवासींचा अधिकार होता आणि आता तो कोर्टानं कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे इथे आदिवासींसाठी आरक्षित जमिनींवर मर्यादा आणण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसू शकते. खरंतर एप्रिल 2023मध्ये अमेझॉनमधल्या सहा हजारांहून अधिक आदिवासींनी देशाची राजधानी ब्राझिलियामध्ये आंदोलन केलं होतं. राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लूला डिसिल्व्हा उर्फ लूला यांनी अमेझॉनच्या जंगलांचं आणि तिथल्या आदिवासींचं रक्षण करण्याचं निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करावं, अशी त्यांची मागणी होती. तुम्हाला आठवत असेल की लूला आता परत निवडणून येण्याआधी जायर बोल्सेनारो ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. बोल्सेनारोंनी अमेझॉन खोऱ्यात शेती, खाणकाम आणि वृक्षतोडीसाठी परवानगी दिली होती. आता लूला यांच्या कार्यकाळात वृक्षतोड आता 33 टक्क्यांनी घटल्याचा सरकारचा दावा आहे. पण वृक्षतोड पूर्णपणे थांबावी आणि लूला यांनी अधिक व्यापक धोरणं आणावीत अशी मागणी आदिवासी करतायत. ॲमेझॉनच्या वर्षावनांचं भवितव्य हा संपूर्ण जगाच्या भविष्याचा मुद्दा आहे, असं ते सांगतात. पण खरंच असं आहे का? गोष्ट दुनियेचीमध्ये आपण हाच प्रश्न विचारतोय की ब्राझिलचे आदिवासी अमेझॉनला वाचवू शकतात का? मूळ निर्मिती- द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ सेप्टेम्बर १६ · १८ मिनेट
भारताच्या चंद्रयान-३ चं प्रपल्शन मोड्यूल 17 ऑगस्ट 2023ला विक्रम लँडरपासून वेगळं झालं. या मोड्यूलवरचं SHAPE हे उपकरण पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवतंय, ज्याच्या आधारे सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेता येऊ शकतो. अशा ग्रहांवर कदाचित पृथ्वीसारखं जीवन असण्याची शक्यताही जास्त असेल. असा पृथ्वीबाहेरच्या सजीवांचा शोध घ्यावासा वाटणं ही नवी गोष्ट नाही. खगोलशास्त्र आणि अंतराळ प्रवासातल्या प्रगतीसोबतच विश्वात इतर कुठे जीवन आहे का हा प्रश्नही पडत राहतो. अनेकदा पृथ्वीवरच परग्रहवासी आल्याच्या चर्चा रंगतात. जुलै 2023 मध्ये असंच काहीसं घडलं. त्यावेळी अमेरिकेच्या एका संसदीय समितीच्या सदस्यांना तीन व्हिडियो दाखवण्यात आले. अमेरिकेन नौदलाच्या लढावू विमानांवरील कॅमेऱ्यांनी आकाशात टिपलेले ते ब्लॅक अँड व्हाईट व्हिडियो काहीसे अस्पष्ट म्हणजे ग्रेनी होते. पण त्यात एक चमकदार अंडाकृती वस्तू आकाशात वेगानं उडताना दिसत होती. ती रहस्यमयी तबकडी पाहिल्यावर पायलट्सची प्रतिक्रियाही या व्हिडियोमध्ये रेकॉर्ड झाली होती. अशीच रहस्यमय वस्तू इतर दोन वेगवेगळ्या वेळेला काढलेल्या व्हिडियोंमध्येही उडताना दिसत होती. हे व्हिडियो फुटेज खरंतर काही काळापूर्वी लीक झालं होतं. पण 2020 साली अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं ते अधिकृतरित्या जाहीर केलं. यूट्यूबवर लाखो लोकांनी हे व्हिडियो पाहिले आहेत. पण यावर्षी जुलैत अमेरिकन काँग्रेसच्या म्हणजे तिथल्या संसदेच्या एका समितीच्या सदस्यांनी त्यावर चर्चा सुरू केली. या व्हिडियोंमागचं सत्य शोधून काढण्याचा आपला उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. आकाशात दिसणाऱ्या अशा रहस्यमयी वस्तू किंवा उडत्या तबकड्या काय आहेत? पृथ्वीशिवाय विश्वात इतर कुठे सजीवसृष्टी आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ सेप्टेम्बर २ · १८ मिनेट
23 ऑगस्ट 2023. भारताच्या चंद्रयान-3 चं लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि चांद्रमोहिमांच्या अध्यायातलं एक नवं पर्व सुरू झालं. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला. भारताचं हे यश आणखी विशेष ठरलं, कारण त्याआधी तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या लुना-25 या यानाला चंद्राच्या याच भागात सॉफ्ट लँडिंग करताना अपयश आलं होतं. सध्या अमेरिका, चीन, जपान, इस्रायलही चांद्र मोहिमांवर काम करतायत. एक प्रकारे चंद्रावर जाण्यासाठी पुन्हा नव्यानं स्पेस-रेस सुरु झाल्याचं चित्र आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं त्याविषयी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. 8 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या पत्रकात इस्रोनं म्हटलेलं की चंद्राच्या कक्षेत गर्दी होतेय. इथे सध्या नासाची चार, दक्षिण कोरियाचं एक आणि भारताचं एक अशी सहा यानं फिरतायत. पुढच्या दोन वर्षांत किमान नऊ यानं चंद्रावर येणार आहेत. त्यामुळे यानांची टक्कर होण्याचा धोका वाढेल अशी भीती इस्रोनं व्यक्त केली. हीच गोष्ट पृथ्वीलाही लागू होते. पृथ्वीभोवती उपग्रहांचं जाळं आहे आणि एखादं यान भरकटलं तर टकरींची मालिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर 2021 मध्ये रशियानं कॉसमॉस-1408 नावाच्या आपल्याच एका निकामी उपग्रहाचे मिसाईलनं तुकडे केले होते. याआधी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असं केलं होतं. त्यानंतर केवळ चुकून होणाऱ्या टकरीच नाही, तर एखादा देश जाणूनबुजून असा हल्ला करू शकतो अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की अंतराळात कुणी काय करावं, काय करू नये, याचे काही कायदे आहेत का? जगभरातल्या देशांमध्ये आता स्पेस वॉर होऊ शकतं का?
२०२३ अगस्ट १९ · १७ मिनेट
यंदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान अचानक काही आंदोलकांनी केशरी रंगाची कन्फेटी म्हणजे कागदाचे तुकडे उडवण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारानं खेळाडू आणि प्रेक्षकांनाही गोंधळात टाकलं आणि सामना थांबवण्यात आला. यंदा अशेस मालिकेदरम्यान आणि अन्य काही मोठ्या स्पर्धांदरम्यानही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या ‘जस्ट ‘स्टॉप ऑइल’ या संघटनेनं असं विरोध प्रदर्शन केलं होतं. या संघटनेची मागणी आहे, की यूके सरकारनं खनिज तेलाचा शोध घेण्यासाठी लायसन्स देणं बंद करावं. ब्रिटनचं सरकार येत्या काही वर्षांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन घेण्यासाठी शंभरहून अधिक प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे. या जीवाष्म इंधनाचा हवामान बदलावर काय परिणाम होतो आहे, हे तुम्हाला ठावूक आहेच. पण जगातल्या कित्येक देशांची अर्थव्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात या खनिज तेलावर अवलंबून आहे की या इंधनाचा वापर पूर्णतः थांबवण्याचा विचार करणंही कठीण जातं. मग आपण खनिज तेलाचा वापर थांबवू शकतो का, हाच प्रश्न गोष्ट दुनियेचीमध्ये आज आपण विचारणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ अगस्ट १२ · १७ मिनेट
लोड शेडिंग. पॉवर कट. बत्ती गुल हे शब्द आपल्यापैकी अनेकांसाठी नवे नाहीत. महाराष्ट्रातला मुंबई-पुण्यासारखा शहरी भाग सोडला तर बहुतेक ठिकाणी आठवड्यातून काही वेळा आणि काही ठिकाणी बऱ्याचदा वीजपुरवठ्यात कपात करावी लागते. पण लोड शेडिंग नित्याचं झालं तर? दक्षिण आफ्रिकेत सध्या तेच होतंय. 2007 पासून इथे लोड शेडिंगला सुरुवात झाली, तेव्हा आधी काही तास वीज जायची. लोकांची थोडी गैरसोय व्हायची पण चिंता करण्यासारखं काही नव्हतं. पण आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. आता तुम्ही म्हणाल आपल्याकडेही अनेक गावांत ही स्थिती आहे, मग दक्षिण आफ्रिकेत वेगळं काय चाललंय? तर दक्षिण आफ्रिकेची चर्चा होते आहे कारण याआधी या देशातल्या वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा, जगातल्या इतर विकसित देशांपेक्षाही अधिक प्रगत होत्या. मग आता तिथल्या सुविधा कशानं कोलमडल्या आहेत? त्यातून भारताला काही शिकता येईल का, याच प्रश्नाचं उत्तर गोष्ट दुनियेची या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात जाणून घेणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन, आवाज - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ जुलाई २६ · १६ मिनेट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जून महिन्यात एक घोषणा केली की त्यांनी अण्वस्त्रांचा एक साठा बेलारूसमध्ये तैनात करण्यासाठी पाठवला आहे. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच पुतिन अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत होते. पण पहिल्यांदाच त्यांनी असं ठोस पाऊल उचललं आहे. बेलारूसमधून ही अण्वस्त्रं पोलंड आणि लिथुआनियावर हल्ला करू शकतात. त्याशिवाय रशियानं इथे अशी क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं पाठवली आहेत ज्यांद्वारा पाचशे किलोमीटर दूरवर अण्वस्त्र डागता येतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिकिन यांनी हे बेजबाबदार पाऊल असल्याची टीका केली आहे. दरम्यान, रशियानं युक्रेनच्या झापोरजिया अणुशक्ती केंद्रावरही कब्जा केलाय. पण केवळ रशियाच्या पुतिन यांच्या धमक्याच चिंतेची गोष्ट नाही. कारण सध्याच्या मल्टीपोलर म्हणजे बहुध्रुवीय जगात चीनही अण्वस्त्रांच्या उत्पादनात अमेरिका आणि रशियाची बरोबरी करू इच्छितो. त्यात सगळीकडे अण्वस्त्र प्रसारबंदी करारांची मुदत संपते आहे आणि नवे करार होत नाहीयेत. म्हणजे मग आता जगात अणू हल्ल्याचा धोका वाढतो आहे का? मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – जान्हवी मुळे एडिटिंग – तिलक राज भाटिया
२०२३ जुलाई १५ · १९ मिनेट
नोव्हेंबर 2019 मध्ये इटलीतल्या व्हेनिस शहरात भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. लाखो घनमीटर पाणी पूरबंधारे ओलांडून ऐतिहासिक इमारतींनी भरलेल्या सिटी सेंटरमध्ये शिरलं. व्हेनिसच्या इतिहासातली ती दुसरी सर्वात मोठी भरती होती. शहरातला ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक इमारतींना धोका निर्माण झाला. अशा प्रचंड मोठ्या भरतीला व्हेनिसमध्ये अॅक्वा आल्टा म्हटलं जातं आणि अनेक शतकं अशा अॅक्वा आल्टाचा सामना या शहरानं केला आहे. पण अलीकडे असं उधाण येण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि या लाटा अधिकाधिक विनाशकारी ठरतायत. हवामान बदलामुळे समुद्राची पातळीच वाढते आहे. त्यामुळेच आता एक नवा आणि अनोखा प्रस्ताव समोर येतोय. समुद्राचं पाणी व्हेनिसखाली जमिनीत खोल भरायचं आणि अख्ख्यं शहरच समुद्रपातळीच्या वर उचलायचं. म्हणजे समुद्राचं पाणीच आता व्हेनिसला वाचवेल का? त्यातून विशेषतः मुंबई आणि कोकणातल्या गावा-शहरांनी काही शिकण्यासारखं आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – जान्हवी मुळे एडिटिंग – तिलक राज भाटिया
२०२३ जुलाई १ · १६ मिनेट
शाळेत विज्ञानाच्या तासाला तुम्ही कदाचित हा प्रयोग केला असेल – धातूच्या दोन पट्ट्या पाण्यात बुडवून बॅटरीला जोडायच्या. विजेचा प्रवाह सुरू झाला, की त्या धातूच्या पट्ट्यांवर मग बुडबुडे जमा होतात. पाण्याच्या रेणूंचं विघटन होऊन त्यातून वेगळा झालेल्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायूमुळे हे बुडबुडे तयार होतात, हेही तुम्हाला ठावूक असेल. तर हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. म्हणजे या वायूवर आग पेटवून स्वयंपाक करता येऊ शकतो. गाड्याच नाही तर विमानांमध्येही ही ऊर्जा वापरता येऊ शकते. एरवी पेट्रोल किंवा कोळशासारखी जीवाष्म इंधनं आपण वापरतो, पण त्यातून कार्बन उत्सर्जन होतं आणि पर्यावरणाचं नुकसानही होतं. पण हायड्रोजनच्या बाबतीत सर्वात जमेची गोष्ट म्हणजे हायड्रोजनच्या ज्वलनानंतर त्याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन पुन्हा पाणीच तयार होतं. त्यामुळे हायड्रोजन हा रिन्यूएबल ऊर्जेचा स्रोत आणि पर्यायानं हवामान बदलाच्या समस्येवरचं एक उत्तर ठरू शकतो. आजची गोष्ट दुनियेची याच विषयावर आहे, की हायड्रोजन आपली ऊर्जेची गरज भागवू शकेल का? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया
२०२३ जुन २४ · १६ मिनेट
घर पाहावं बांधून असं म्हणतात. पण घर बांधणंच नाही, तर घर भाड्यानं मिळवणंही कठीण असतं, हे तुम्ही मुंबईत राहात असाल, किंवा तिथे कधी गेला असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल. महाराष्ट्राच्या राजधानीत एकीकडे लोकांना घर मिळवणं कठीण जातं, तर दुसरीकडे एक लाखाहून अधिक घरं रिकामी असल्याचं काही वर्षांपूर्वी माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्समध्ये तुम्ही वाचलं असेल. हा विरोधाभास फक्त मुंबईपुरता किंवा भारतापुरता मर्यादित नाही. जपानमध्येही अशी समस्या जाणवते आहे आणि त्यामागे अनेक कारणं आहेत. सरकार त्यावर अनोखे उपायही शोधायचा प्रयत्न करतं. जानेवारी 2023 मध्ये जपानच्या टोकियो प्रदेशातल्या कुटुंबांसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली. ते या प्रदेशातला शहरी भाग सोडून बाहेर वसण्यास तयार असतील, तर त्या कुटुंबातल्या प्रत्येक मुलाला दहा लाख येन म्हणजे जवळपास पाच लाख 80 हजार रुपये दिले जातील. पण यासाठी एक अट अशी होती की घरातील किमान एका व्यक्तीकडे त्या ग्रामीण भागात नोकरी असायला हवी आणि त्यांनी तिथे एखादा धंदा सुरू करण्याचं वचन द्यायला हवं. तसंच सरकारकडून हे पैसे घेतल्यावर पाच वर्षांच्या आत ते पुन्हा शहरात आले तर त्यांना सगळी रक्कम सरकारला परत द्यावी लागेल अशीही अट घालण्यात आली. जपानमध्ये बहुतांश लोक शहरांत राहतात, तिथे एकीकडे घरांची कमी आणि दुसरीकडे ओस पडलेली घरं अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उत्तर म्हणून अशा योजना आणल्या जातात. पण नेमकं काय घडतंय? जपानमध्ये लाखो घरं ओस का पडली आहेत, याच प्रश्नाचं उत्तर गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे, बीबीसी मराठी एडिटिंग - तिलक राज भाटिया
पछिल्लो १०० एपिसोड देखाइएको।