मल्टिपल स्क्लेरॉसिस आजार रोखणं लवकरच शक्य होईल का? BBC News Marathi
२०२४ जुन १५ · १६ मिनेट
मेंदूचा आजार म्हणजे न्यूरॉलॉजिकल आजार असलेल्या मल्टिपल स्केलॉरिसिस म्हणजे MS मागे EBV या विषाणूचा हात असावा, असं संशोधकांना काही काळापासून वाटत होतं. दोन वर्षांपूर्वीच ते सिद्ध झालं. या विषाणूचा शोध लागला त्यालाही नुकतीच पन्नास वर्ष झाली आहेत. सध्या जगभरात तीस लाख लोक मल्टिपल स्क्लेरॉसिसनं पीडीत आहेत. हा आजार रोखणं आता खरंच शक्य होणार आहे का? गोष्ट दुनियेचीमध्ये आजच्या भागात तेच जाणून घेणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया