म्यानमार देश म्हणून विखुरण्याच्या मार्गावर आहे का? गोष्ट दुनियेची BBC News Marathi
२०२४ जुन ८ · १६ मिनेट
भारताचा शेजारी देश असलेला म्यानमार पुन्हा धुमसतो आहे. म्यानमारमध्ये लष्करशाही आहे आणि सैन्याच्या नेतृत्त्वातलं त्यांचं सरकार सध्या गृहयुद्धात गुंतलं आहे. खरंतर भारताच्या उंबरठ्यावर आग्नेय आशियातल्या या देशात अंतर्गत कलह ही नवी गोष्ट नाही. पण आताचा हा नवा संघर्ष देशाला मोठ्या संकटात टाकतो आहे. म्हणूनच या आठवड्यात गोष्ट दुनियेचीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्यानमार विखुरण्याच्या मार्गावर आहे का? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया