कैलास मानसरोवर यात्रा खरंच या वर्षी पुन्हा सुरू होणार? BBC News Marathi
२०२५ जनवरी २९ · ५ मिनेट
2025 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार अशी घोषणा करण्यात आलीय. कैलास आणि मानसरोवराची मिळून यात्रा केली जाते. हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन धर्मांचे अनुयायी ही यात्रा पायी करतात. या यात्रेशी चीनचा काय संबंध? कैलास मानसरोवर यात्रेचं आणि भारत - चीन संबंधांचं एकमेकांशी काय नातं आहे? कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची भूमिका का महत्त्वाची आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : शरद बढे